संपूर्ण शरीराचे विकार व संधिवात वर सोपे उपाय - श्री स्वामी समर्थ


सर्व प्रकारच्या व्याधी, सर्व प्रकारच्या बाधा, पीडा,  सर्व प्रकारची दुःख, संकटे, अपयश, दैविक कोप, अपमृत्यूयोग, वैगेरे टळून दीर्घायुरारोग्य, सुख व समृद्धी प्राप्तीसाठी नवनाथसंप्रदायात पुढील 'श्रीशिवमृत्युंजय' जपाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.  हा जप कमीतकमी 27 वेळा दिवसभरांत किंवा रात्री शांतपणे जपणे आवश्यक  आहे.

मंत्र - 


" ॐ र्ह्रौं जुँ सः l ॐ भुर्भुवः स्वः l ॐ त्र्यंम्बकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् l ऊर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीयमामृतात l स्वः भुवः भूः ॐ l सः र्ह्रौ ॐ l "

या मंत्राखेरीज 'श्रीशिवकवच', श्रीदत्तवज्रकवच, किंवा 'श्रीदुर्गाकवच नित्य वाचल्यानेही सर्व कल्याणप्रद होते.

1)  हातपाय वातामुळे वांकडे होणे - 

कुटकी 3 ग्रॅ., धने 6 ग्रॅ., बेहेडेदळ 3 ग्रॅ., काढेचिराईत 3 ग्रॅ., वावडींग 4 ग्रॅ., सुंठ 6 ग्रॅ., रिंगणमूळ 3 ग्रॅ., एरंडमुळ 3 ग्रॅ., धमासा 6 ग्रॅ., श्वेतपुनर्नवामूळ 3 ग्रॅ., गुळवेल 12 ग्रॅ., जेष्ठीमध 12 ग्रॅ., कडूनिंबाची पाने 21 यांचा काढा रोज एकदां याप्रमाणे तीन आठवडे घ्यावा.

किंवा (वातविकाराने शरीरावयव दुखण्यावर) -  

अर्धा किलोग्रॅम तिळाचे तेलात दोन कांदे व दोन लसणीचे कांदे सालीसह बारीक चिरून घालून ते तेल मंदाग्नीवर चांगले उकळून घ्यावे.  तेल थंड झाल्यावर ते वस्त्रगाळ करुन घेऊन त्यांत 1 औस टर्पेंन्टईन, 1 औस निलगिरी तेल, 1 औस  मिथिल सिलीकेट (Methyl Salicylate) व 20 ग्रॅम कापूर आणि 1 चमचा वापरलेले रॉकेल एवढे मिसळून हे मिश्रण बाटलीत भरुन ठेवावे.  हे तेल रात्री दुखऱ्या भागावर मॉलिश करुन लावावे. त्वरित गुण येतो.



किंवा (वातविकारावर) - 

अश्वगंध व शतावरी यांचे चूर्ण समभाग दोन्ही मिळून चमचाभर, तूप व मध यांत कालवून सकाळ संध्याकाळ, सतत एकवीस दिवस घ्यावे.

किंवा - रासना, सुंठ, एरंडमुळ, गुळवेल, काठेगोखरु व पुनर्नवामूळ, सर्व समभाग कुटून पूड करावी.  चमचाभर चूर्ण कपभर पाण्यात विस्तवावर आटवून अर्धा कप करावा व सकाळ संध्याकाळ मिळून द्यावा.  तसेच शतावरीच्या मूळ्यांचा रस व तेल (खोबरेल किंवा तिळाचे) समभाग उकळवून तेल तयार करावे.  हे तेल वातविकारावर वरुन चोळण्याच्या कामी फार उपयुक्त आहे.

किंवा ( वातामुळे अंगास सूज येत असल्यास) - काळ्या तुळशीच्या पानांच्या चार चमचे रसात पाव चमचा मिरपूड व अर्धा चमचा गाईचे तूप घालून सकाळी एकदां याप्रमाणे सतत सात दिवस द्यावे.

किंवा (सर्व प्रकारच्या वातविकारावर (वायूविकारावर)- चार चमचे सोललेल्या लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यांत बारीक कुटून घ्याव्यात.  मग त्यात हिंग, जिरे, सेंधेलोण, पादेलोण, सुंठ, मिरी, पिंपळी ही प्रत्येकी वाटाण्याएवढी घालून, त्याच्या वाटाण्याएवढ्या गोळ्या करून, सुकवून ठेवाव्यात.  रोज जेवणापूर्वी एक गोळी खावून त्यावर एरंडमुळाचा काढा पाव कप गरम गरम घ्यावा.  याने अर्धांगवात, सर्वांगवात,  पोटातील वात व कृमी हे विकार नष्ट होतात.  पूर्ण बरे वाटेपर्यंत हा उपाय करावा.

किंवा (सर्व प्रकारच्या वातविकारांवर) - आल्याचा रस चार ग्रॅम, मध चार ग्रॅम,  एरंडेल 1 चमचा,  रात्री झोपतेवेळी एकत्र करून घ्यावे व वर उन पाणी प्यावे.  पथ्य तिखट, तेलकट, आंबट, वातुळ पदार्थ वर्ज्य.  हमखास गुण येतो.

किंवा - लसणाच्या दोन पाकळ्या कपभर दुधात कुस्करुन द्यावे.




2)  सांधेदुखीवर - 

वेखंड 3 ग्रॅ., काळी मिरे 4 ग्रॅ., देवदार 3 ग्रॅ., धने 6 ग्रॅ., कुटकी 3 ग्रॅ., बेहेडेदळ 6 ग्रॅ., काडेचिराईत 6 ग्रॅ., रिंगणीमूळ 4 ग्रॅ.,एरंड मूळ 4 ग्रॅ., धमासा 6 ग्रॅ., श्वेतपुनर्नवामूळ 4 ग्रॅ., ज्येष्ठीमध 12 ग्रॅ.,गुळवेल 12 ग्रॅ.,  कडुनिंबाची पाने 21 यांचा काढा रोज एकदा याप्रमाणे तीन आठवडे घ्यावा.

किंवा - दारुहळद 3 ग्रॅ., मंजिष्ठ 4 ग्रॅ., बेहेडेदळ 6 ग्रॅ., धने 4 ग्रॅ., काढेचिराईत 6 ग्रॅ.,  वावडींग 4 ग्रॅ., सुंठ 4 ग्रॅ., रिंगणीमूळ 3 ग्रॅ., एरंडमूळ 3 ग्रॅ., धमासा 6 ग्रॅ., ज्येष्ठीमध 12 ग्रॅ., गूळवेल 12 ग्रॅ., श्वेतपुनर्नवामूळ 3 ग्रॅ., कडुनिंबाची पाने 21 यांचा काढा रोज दोनदां याप्रमाणे तीन महिने घ्यावा.

किंवा - काळी मिरी दहाबारा दाणे वाटून चार चमचे सरसूच्या (सिरसोंका तेल) तेलांत (राईच्या तेलांत) कालवून ते तेल दुखण्याऱ्या भागी लावावे. 

किंवा - एरंडेल तेल (Castor Oil) दोन चमचे, व अर्धा चमचा सूंठपूड कपभर दूधातून रोज दोनदा, सतत अकरा दिवस घेतल्यास वातविकार बरे होतात.



उष्णवात - 

(अंगात जळजळ निर्माण करणारा) असल्यास गुळवेलाच्या कपभर काढ्यात अर्धा चमचा सूंठ पूड टाकून रोज दोनदां घ्यावा.

आमवात - 

असल्यास हिरडा, सुंठ, ओवा ह्यांचे सारखेप्रमाण (समप्रमाण) घेऊन, चूर्ण करुन रोज दोनदां कोमट पाण्याबरोबर घ्यावे.

साधावात - 

असल्यास सूंठपूड, तूप व साखर प्रत्येकी एक चमचा आणि दूध एक कप चांगले उकळून, कोमट असतांना प्यावे.

किंवा -  'त्रिफळा गुग्गुळ' 2 ते 4 गोळ्या दिवसांतून 3 वेळां कोमट पाण्याबरोबर घ्याव्या किंवा 'पुनर्नवागुग्गुळ', 'वातविध्वंस' यापैकी कोणत्याही 1 ते 2 गोळ्या दिवसातून तीनदां मध अथवा पाण्याबरोबर घ्याव्या.  याचबरोबर 'भल्लातकासव', अथवा 'दशमूलारिष्ट' कोणतेही एक जेवणानंतर, 2 वेळां समभाग पाण्याबरोबर घ्यावे.

किंवा - मोठी रोठा सुपारी घेऊन रात्री पाण्यांत भिजत घालावी. पहांटेला ती पाण्यांत वाटून जुन्या चिंचेच्या पाण्यांत केलेल्या घट्ट बलकामध्ये (चिंचेचा घट्ट रस)  तो वाटलेली सुपारी ठेवून ती तशीच गिळावी आणि वारंवार ग्लासभर गरम पाण्याचा घोट घेत जावा म्हणजे पोट साफ होऊन सर्वप्रकारचे संधीवात निघून जातात.  किंवा कडू किराईत 1 चमचा रात्री ग्लासभर पाण्यांत भिजत घालून सकाळी ते पाणी गाळून त्यांत कापूर 2 मोठया वड्या व शिलाजीत पाव चमचा, तसेच मध 1 चमचा मिसळून प्यावे.  याप्रमाणे सतत सात दिवस घेतले असतां सांध्याचे तसेच गरमीचे सर्व विकार नष्ट होऊन शरिरात शक्ती येते. 

किंवा -  शरीरांत नैसर्गिक रीतीने  'वंगण' तयार होत नाही यालाच लुब्रीकन्ट असे म्हणतात.  यामुळे संधीवाताचा त्रास होतो.  याकरितां जेवणानंतर दोन चमचे शुद्ध खोबरेल तेल घेऊन त्यावर कपभर गरम पाणी पित जावे.  हे नियमितपणे करावे.  या उपायाने आश्चर्यकारकपणे अनुभव चांगला येतो.

संबंधित त्रासावर अधिक प्रभावकारक उपाय मिळवण्यासाठी Subscribe करा. 
Subscription Fees : 501/- Rupees only

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


Post a Comment

0 Comments

email-signup-form-Image
email-signup-form-Image
0
Loading...