ज्योतिषशास्त्राद्वारे व्यक्तीच्या आरोग्याचे निदान कसे करता येते ? - सोपी पद्धत.


भारतीय ज्योतिषशास्त्रानेही विशेष अभ्यास करून ग्रहफल संबंधीत अभ्यासपद्धत तयार केली आहे.  सत्तावीस नक्षत्रे, बारा राशी, सप्तग्रह यांचा संबंध मानव शरीराशीच केवळ आहे व त्यावरून व्यक्तीच्या आरोग्याचे निदान करता येते हे निरीक्षणाने समजून येते.

शरीर आणि खगोलशास्त्र :



ज्योतिष शास्त्राने मानवी शरीराचा आणि ग्रह नक्षत्रांचा संबंध अभ्यासिला आहे तो याप्रमाणे ( राशी व नक्षत्रे शरीर शास्त्राप्रमाणे अंतर्भूत असतात ).


  • 1.  अश्विनी, भरणी, कृत्तिका ही नक्षत्रे मेष राशी व कुंडली प्रथम स्थान यांवरून - मानवी स्वरूप, स्वभाव व आयुष्य आणि डोक्याचा भाग यांचा विचार करतात.
  • 2.  रोहिणी, मृग,  आद्रा ही नक्षत्रे,  वृषभ राशी व कुंडली द्वितीय स्थान यांवरून - वाणी, नेत्र आणि मुखाचा भाग यांचा विचार करतात.
  • 3.  पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा ही नक्षत्रे मिथुन राशी व कुंडली तृतीयस्थ यांवरून - गळा, हृदय व औषधी देण्यासंबंधीचा विचार करतात.
  • 4.  मघा, पूर्वा, उत्तरा ही  नक्षत्रे, कर्क राशी व कुंडली चतुर्थ स्थान यांवरून - रोगसंबंधीचे यश, सुख व फुफ्फुसे, बरगड्या व हृदय यांचा विचार करतात.
  • 5.  हस्त, चित्रा, स्वाती ही नक्षत्रे सिंह राशी व कुंडली पंचम स्थान यांवरून लिव्हर, पाचकद्रव्ये, व पोट यांचा विचार करतात.
  • 6.  विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा ही नक्षत्रे, कन्या राशी व कुंडली षष्ठ स्थान यांवरून - कंबरेचा भाग व रोगनिदान यांचा विचार करतात.
  • 7.  मूळ, पूर्वाषाढा ही नक्षत्रे, तूळ राशी व कुंडली सप्तम स्थान यांवरून - ओटीपोट, धातुविकार यांचा विचार करतात.
  • 8.  उत्तराषाढा, श्रवण ही नक्षत्रे वृश्चिक राशी व कुंडली अष्टम स्थान यांवरून - गुह्येन्द्रीये, उपदंशादी गुप्तरोग, विषबाधा व मृत्युस्थिती यांचा विचार करतात.
  • 9.  धनिष्ठा, शंततारका ही नक्षत्रे, धनुराशी व कुंडली नवम स्थान यांवरून - मांड्या व जघन भाग, आकस्मिक आजार यांचा विचार करतात.
  • 10. पूर्वाभाद्रपदा हे नक्षत्र मकर राशी व कुंडली दशमस्थान यांवरून - गुडघे, वातविकार, आकस्मिक गूढ आजार यांचा विचार करतात.
  • 11. उत्तराभाद्रपदा हे नक्षत्र कुंभ राशी व कुंडली एकादशस्थान यांवरून - पोटऱ्या, जखमा, व्रण, त्वचा रोग, पित्तप्रकोप यांचा विचार करतात.
  • 12. रेवती हे नक्षत्र, मीन राशी व कुंडली द्वादशस्थान.यांवरून - पाऊले, तळपाय, जळवात व तत्सम रोग यांचा विचार करतात.


याखेरीज पुढील योगांवर जर कोणी आजारी पडला तर तो आजार गंभीर ठरतो असाही नित्याचा अनुभव आहे.


  • 1)  रविवार असून - मघा, अनुराधा, भरणी यांपैकी कोणतेही नक्षत्र असून तिथी द्वादशी असेल तर -
  • 2)  सोमवार असून - विशाखा, आद्रा, उत्तराषाढा यांपैकी कोणतेही नक्षत्र असून तिथी एकादशी असेल तर -
  • 3)  मंगळवार असून - आद्रा, मघा, शततारका  यापैकी कोणतेही नक्षत्र असून तिथी पंचमी असेल तर - 
  • 4)  बुधवार असून - उत्तराषाढा, अश्विनी विशाखा यापैकी कोणतेही नक्षत्र असून तिथी तृतीया असेल तर -
  • 5)  गुरुवार असून - शततारका, मृग, ज्येष्ठा यापैकी कोणते नक्षत्र असून तिथी षष्ठी असेल तर -
  • 6)  शुक्रवार असून - अश्विनी, आश्लेषा, श्रवण यापैकी कोणतेही नक्षत्र असून तिथी अष्टमी असेल तर -
  • 7)  शनिवार असून - पूर्वाषाढा, हस्त, पूर्वाभाद्रपदा यापैकी कोणतेही नक्षत्र असून तिथी नवमी असेल तर -


याचप्रमाणे परस्परांच्या शत्रुग्रहांच्या राशीत किंवा कुंडलीतील स्थानात तसेच पापग्रहांच्या (वद्य पक्षातील चंद्र, मंगळ, रवि, शनि) दृष्टीमध्ये किंवा युतीमध्ये जर ग्रह असले तर ते कोणत्या प्रकारचे आजार निर्माण करतात त्याचाही पुढीलप्रमाणे अनुभव येतो.


  • 1)  रविमुळे - ज्वर, क्षय, अतीसार हे रोग उद्भवतात.
  • 2)  चंद्रामुळे - पंडु, कावीळ, स्त्रीयांपासूनचे रोग, कफ, दमा हे रोग होतात.
  • 3)  मंगळामुळे - उष्णता, व्रण, खरूज, इतर त्वचा रोग, प्लेग, देवी, गोवर, कांजण्या हे रोग उद्भवतात.
  • 4)  बुधामुळे - गुह्यरोग, पोटाचे विकार, कुष्ठरोग, मंदाग्नी, पोटदुखी, संग्रहणी, गुल्म (डिसेन्ट्री) हे रोग उद्भवतात.
  • 5)  गुरुमुळे - मेदविकार होतात.
  • 6)  शुक्रामुळे - धातुविकार, गर्भाशयाचे व संततीविषयक आजार होतात.
  • 7)  शनिमुळे - सर्व प्रकारचे वात विकार, पिशाच्च बाधा हे त्रास होतात.  तसेच अपस्मार, कृमी, कुष्ठरोग, गळू, ट्युमर, भ्रम, व वेड यासारखे रोग उद्भवतात.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...



Post a Comment

0 Comments

email-signup-form-Image
email-signup-form-Image
0
Loading...