शरीर आणि शक्तीलहरी परस्पर संबंध कसा घडतो ?


भारतीय रोगनिदान शास्त्राने विद्युत व चुंबकीय शक्ती यांतून मिळणाऱ्या कंपनांचा (vibrations) विचार रोग निदान व उपचार या दोन गोष्टींसाठी केलेला आहे.  यासाठी शारीरिक कंपन लहरींचा (physical waves) विचारही योग्यतऱ्हेने केलेला आढळतो.  मानवी मन आणि शरीर यांवर होणारे बाह्य घटनांचे सूक्ष्म आघात यांचा सखोल अभ्यास याठिकाणी केला गेल्याने मानव प्राणी औषधविना रोगमुक्ती मिळवू शकतो याचा निश्चित निर्णय येथे झालेला आहे.

आपल्या डोक्याचा भाग - ताळूपासून ते कंठापर्यंत - यांतून अल्फा, थिटा, गॅमा, बीटा, डेल्टा, व कापा या विद्युतलहरी प्रसारीत होत असतात. यापैकी अल्फा व थीटा ह्या विद्युतलहरींचा मानवाच्या मानसिक स्थितीशी निकटचा संबंध आहे.  जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मनोधैर खचलेले असते तो निराश झालेला असतो, तेव्हा त्याच्या मेंदूतून उत्सर्जित होणाऱ्या अल्फा व थिटा या विद्युत लहरींचे प्रमाण घटलेले असते.  अशावेळी चुंबकीय लहरींचा उपयोग करून तसेच रुग्णाईताचे मनोभावना उत्तेजित करून या अल्फा, थिटा लहरींचे प्रमाण वाढविता येते व त्यांचा उपयोग रुग्णाला पुनः स्वास्थ्य मिळवून देण्यासाठी करता येतो.  

पाण्यामध्ये विद्युतप्रवाह सोडून व अल्प वेळांतच तो काढून घेऊन ते पाणी रुग्णाला प्यावयास दिल्याने त्याला उत्तेजन प्राप्त झाल्याचे आढळून आले आहे.  वेदना थांबविण्यासाठी दुखऱ्या भागावर चुंबक फिरविल्याने वेदना थांबत असल्याचा अनुभव येतो.  चेतनाहीन शरीरावयावर तांबडा रेशमी कापडाचा तुकडा गुंडाळून त्यावर सूर्यकिरण पाडले किंवा चुंबक फिरविला तर कांही दिवसांनी आश्चर्यकारक फरक जाणवतो.  




घाबरलेल्या रुग्णाच्या छातीवर तांबडा रेशमी कपडा गुंडाळून ठेवल्यानेही (रेशीम विद्युत वाहक असल्याने) रुग्णाच्या मनोविकारांवर त्याचा चांगला परिणाम झाल्याचा अनुभव येतो. सततच्या डोकेदुखीकरिता गडद निळ्या रंगाच्या कापडाची पट्टी डोक्याला बांधल्यानेही चांगला प्रत्यय येतो.

शरीरान्तर्गत इंद्रिये : 

निसर्गाने स्वास्थ्यासाठी अशी कितीतरी साधने निर्माण केलेली आहेत.  मात्र त्यांचा उपयोग आम्हांला जाणीवपूर्वक करून घेता आला पाहिजे.  रोग निवारणाचे प्रमुख साधन केवळ 'औषध' हेच आहे असे समजणे म्हणजे फार मोठे अज्ञान आहे.  व्यापारांत ज्याप्रमाणे नफा कसा होतो हे जाणून घेण्यापेक्षा तोटा कसा होतो हे जाणून घेणे म्हणजे यशस्वी व्यापारी होणे हे आहे.  तद्वत आजार होण्यापूर्वी तो कसा होतो हे जाणून घेऊन त्याप्रमाणे शरीरारोग्याची काळजी घेणे अत्यंत  महत्वाचे आहे.  

मूलतः आपल्या शरीराचे स्वास्थ्य पाच प्रमुख अवयवांच्या पोट, फुफ्फुसे, हृदय, ग्रंथीसमुह आणि मेंदू - यांच्या सुव्यवस्थित कार्य चालू राहण्यावर अवलंबून आहे.  वरीलपैकी एकाही अवयवाने सहकार्य करण्याचे नाकारल्यास आपले शरीर अस्वस्थ होऊन अनेक प्रकारच्या पीडा, दुःख, रोगांना निमंत्रण दिले जाईल.  दीर्घ श्वसनाच्या व्यायामात सर्व अवयवांच्या गति-विधींना प्रभावित करून त्यांचे स्वास्थ टिकविण्याची शक्ती आहे.  खाल्लेले अन्न नीट पचले तरच त्याचे द्रवांत (अन्नरसांत) रूपांतर होते आणि द्रवाचे रक्तात रूपांतर होते.  

दीर्घ-श्वसन पद्धतीने जठरपेशी संचलन (कार्य) सुरळीत चालू राहून त्याची कार्यशक्ती वाढते.  याबरोबरच आणखी एक महत्वाचा फायदा होतो तो हा की, आपल्या वक्ष:स्थलाच्या दोन्ही बाजूंस एक एक याप्रमाणे दोन फुफ्फुसे असून शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने यांचे महत्व फार आहे.  वैज्ञानिकांच्या मते जर ह्या फुफ्फुसांना जमिनीवर नीट पसरविले तर त्यांना कमीत कमी दोन चौरस बिघा जमिन लागेल.  यामध्ये अठरा करोड वायुकोष आहेत.  हे वायुकोष हवेतील ऑक्सिजन (श्वसनाद्वारे फुफ्फुसांत येणारा)  साठवून रक्त शुद्धिकार्यास मदत करतात.  तथापि या सर्व वायुकोषांचा उपयोग होत नाही आणि कित्येक कोष निष्क्रिय राहतात आणि म्हणूनच रक्त शुद्धि व दूषित प्रकारांना आळा घालण्याचे काम स्वाभाविक रीतीने होऊ शकत नाही.


ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


Post a Comment

0 Comments

email-signup-form-Image
email-signup-form-Image
Loading...