मूतखडा व अर्धांगवात विकारावर घरगुती सोपे उपाय


मूतखडा -

आंवळकांठी व गूळ रोज सकाळी खावा.

किंवा - घोळीच्या माशाच्या डोकीत तीन दगड (पांढरे) असतात.  रोज सकाळी चमचाभर दूधांत एक दगड अर्धा उगाळून घ्यावा.  हे सतत सात दिवस करावे.  यामुळे मूतखडा  विरघळून जातो.



किंवा - मुळ्याच्या भाजीचे बी चार चमचे अर्धा लिटर पाण्यांत उकळून, ते पाव लिटर आटवून रोज दोनदा याप्रमाणे सतत तीन दिवस घ्यावे.

किंवा - शिलाजीत, पाषाणभेद, पिंपळी व वेलदोडे यांचे समभाग चूर्ण चमचाभर घेऊन पाण्याबरोबर घ्यावे.

किंवा शेवग्याच्या मूळीचा काढा, दोन कपाचा आटवून एक कप करून कोमट असतांनाच घेतला असतां फार जुना व त्रासदायक मूतखडा पडून जातो.

किंवा - शुद्ध शिलाजीत पूड बोराएवढी घेऊन ती चमचाभर मधात कालवून रोज दोनदां, जेवणापूर्वी पांच तास अगोदर द्यावी.  यामुळे लघवीच्या तक्रारी नाहीशा होऊन मुतखडा पडून जातो.

किंवा - सूर्यफुलाच्या झाडाचे मूळ गाईच्या दुधात वाटून दोन चमचे घेतले असतां मूतखड्याचे तुकडे होऊन तो पडून जातो.  हे सतत दोन किंवा तीन दिवस करावे.

किंवा - चवळीच्या भाजीचा दोन चमचे रस देत जावा.

अर्धांगवात - 

गूळवेल 12 ग्रॅ., ज्येष्ठीमध 12 ग्रॅ., धमासा 6 ग्रॅ., एरंडमूळ 3 ग्रॅ., रिंगणीमूळ 3 ग्रॅ., सुंठ 6 ग्रॅ., वावडींग 4 ग्रॅ., काढेचिराईत 6 ग्रॅ., रासनामूळ 3 ग्रॅ., देवदार 3 ग्रॅ., बाळहरडे 4 ग्रॅ., वेखंड 4 ग्रॅ., श्वेतपुनर्नवामुळ 3 ग्रॅ., कडूनिंबाची पाने 21 यांचा काढा रोज दोनदां याप्रमाणे दोन महिने घ्यावा.



किंवा  (पक्षाघात विकारावर) - उडीद, कुहिली, एरंडमूळ, लघुचिकणा, यांचा काढा (सर्व पदार्थ समभाग घ्यावेत) करून त्यांत हिंग व सैंधव (उपवासाचे मीठ) घालून (1 कप काढ्यात चिमूटभर एवढ्या प्रमाणात) घालून तो काढा दिवसांतून दोनदां पिण्यास द्यावा.

किंवा - सोललेली लसूण चार चमचे (किंवा दोन कांदे) घेऊन त्यांत हिंग, जिरे, सैंधव, संचळ, आणि त्रिकटू यांचे चूर्ण प्रत्येकी पाव चमचा घालून सर्व एकत्र खलून त्याच्या वाटाण्याएवढ्या गोळ्या करुन सुकवून ठेवाव्या, या गोळ्या दिवसांतून तीन वेळा 2/2 गोळ्या पाण्याबरोबर घ्याव्या.  याचप्रमाणे कडव्या पांढऱ्या भोपळ्याच्या बीया पाण्यांत वाटून व गरम करुन त्याचा लेप द्यावा.

किंवा - शरीराच्या एका संपूर्ण अर्ध्या बाजूची व दोन्ही पायांची शक्ती संपूर्ण प्रमाणात जाते.  अवयवांच्या नियंत्रणाचे केन्द्र मेंदूत असते.  मेंदूतील रक्तवाहिन्या फुटून त्यांतील बनलेल्या रक्ताच्या गाठींचा दाब ह्या केंद्रावर येतो.  किंवा रक्तप्रवाह या केंद्राला मिळत नाही.  

किंवा मज्जातंतू तुटतो व अशा कारणांनी हा आजार येतो.  'अश्वगंधादि चूर्ण' अर्धा चमचा दूधाबरोबर रोज एकदां घ्यावे.  'योगराज गुग्गुळ' 2 गोळ्या दिवसातून 3 वेळा तूप साखरेसह घ्यावे .  'रास्ना सप्तक काढा' अथवा 'महारास्नादि काढा' 2 चमचे समभाग पाण्याबरोबर दिवसांतून 3 वेळां घ्यावा.  'महानारायण तेल' बाहेरून शरीरावर चोळावे.


संबंधित त्रासावर अधिक प्रभावकारक उपाय मिळवण्यासाठी Subscribe करा. 
Subscription Fees : 501/- Rupees only

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...


Post a Comment

0 Comments

email-signup-form-Image
email-signup-form-Image
0
Loading...