Header Ads

आम्लपित्त, अग्नीमांद्य ( अपचन व बद्धकोष्ठता ) विकारावर प्रभावी उपाय.


सोनमुखीची पाने 11, सुंठ 1 चमचा, संचल (ज्यास पादेलोण म्हणतात तो)  1 चमचा आणि वेलची पाव चमचा व लवंग पाव चमचा एकत्र कुटून चूर्ण करावे हे चूर्ण लिंबाच्या रसात घोटून वाटाण्याएवढ्या गोळ्या करून सुकवून ठेवाव्यात. रोज रात्री झोपतांना दोन गोळ्या तोंडात टाकून चघळून गिळाव्यात म्हणजे अन्नाचे पचन लवकर होऊन भूक लागते.  पोट व्यवस्थित साफ होते.  अजीर्णाचा बिमोड होतो व पोटातील वायू (गॅसेस) नाहीसा होऊन तोंडाला चव येते.

किंवा (अग्नीमांद्य) -  गरम पाण्यांत लिंबू व मध घालून प्यावे.

किंवा - पिंपळी आणि सुंठ यांचे चूर्ण पाव चमचा घेऊन त्यांत साखर घालून खावे.

किंवा - जेवणानंतर अर्धा पेला पाण्यांत लिंबू पिळून ते पाणी प्यावे.

किंवा (अग्नीमांद्य) - (अग्नी म्हणजे पचन करणारी शक्ती, पचनशक्ती कमी होणे, भूक न लागणे ह्या विकारालाच अग्नीमांद्य म्हणतात)

'अग्नीतुंडीरस' या गोळ्या, 1 ते 2 गोळ्या दिवसातून तीन वेळा गरम पाणी किंवा तूप साखरेबरोबर घ्याव्या.

किंवा -  'लशुनादिवटी' ही 1 गोळी दिवसातून 4 वेळा गरम पाण्या बरोबर घ्यावी.

किंवा - ' पंचकोलासव' हे दिवसातून 2 वेळा दोन चमचे, तेवढेच पाणी मिसळून जेवणानंतर घ्यावे.

किंवा - अन्न अर्धवट किंवा अजिबात न पचणे, जळजळणारे ढेकर येणे, पोट जड होणे, दुखणे, तोंडाला चव नसणे, अन्न नकोसे वाटणे ही या विकाराची लक्षणे आहेत.  'वातगजाकुश' अथवा 'शंखवटी' किंवा 'शूलहरवटी' यापैकी कोणत्याही 2 गोळ्या दिवसातून 3 वेळा कोमट पाण्याबरोबर घ्याव्यात.किंवा ( आम्लपित्त) - शरीरातील अन्नाचे पचन पित्त करीत असते.  हे विकृत झाले की पचनक्रिया बिघडते.  छातीत जळजळणे, घशांत आंबट ढेकर येणे, पोटांत मळमळणे, उलट्या होणे, अंग गरम होणे, डोळ्यांची जळजळ इ. लक्षणे या विकाराची आहेत 'सूतशेखर' 2 गोळ्या दिवसातून 3 वेळा आल्याचा रस, लिंबू सरबत, किंवा दूधाबरोबर घ्याव्यात.

किंवा - 'अभयारिष्ट' 2 चमचे समभाग पाणी घालून जेवणापूर्वी 2 वेळा घ्यावे.

किंवा  ( भूक लागण्यासाठी) - जेवावयास बसण्यापूर्वी मिठाबरोबर आले खाल्ल्यास पचनशक्ती व भूक वाढते.

किंवा - काढेचिराईत व माका, यांचा काढा करून त्यांत मध घालून घ्यावा.

किंवा - फणसाचे गरे खाल्ल्याने जर अपचन झाले असेल तर त्यावर केळे खावे.

केळे खाल्ल्याने अपचन होत असेल तर त्यावर तूप खावे.  तूप फार खाल्ल्याने जर अपचन झाले असेल तर कागदी लिंबाचा रस घ्यावा.  उसाच्या रसाने अपचन झाले असल्यास आल्याचा रस घ्यावा.

वायूगोळ्याच्या ( पोटात वायूचा गोळा होऊन पोट फुगणे ) विकारावर - जास्वंदीच्या पानांचा रस पाव कप, अर्धा कप पाण्यांत मिसळून सकाळी रिकाम्या पोटी सतत सात दिवस पिण्यास द्यावा.

किंवा - शेवग्याच्या पानांचा रस ग्लासभर काढून त्यांत दोन चमचे खडीसाखर घालून सकाळी रिकाम्या पोटी सतत तीन दिवस द्यावा.

मोडशी ( पोटात मुरडा, वेदना होऊन जुलाब होणे), अग्नीमांद्य (भूक न लागणे, अपचन होणे),  बद्ध कोष्ठता, मूळव्याधी व पोटफुगी या विकारांवर) - हिंग, बिडलोण, वेखंड, सुंठ, ओवा, बाळ हरितकी यांचे वाटाण्याऐवढे चूर्ण अर्धा कप ताकात मिसळून द्यावे. हे दिवसांतून दोनदा, सतत दोन दिवस द्यावे. 

पोट फुगून जुलाब होत नाहीत त्यावर - कागदी लिंबाच्या रसात थोडे जायफळ उगाळून द्यावे.

पोटाचे आरोग्य नीट राहिले तरच दीर्घायुष्य लाभते.  पोट नेहमी नितळ असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.  केवळ आहार व औषधे यांवरच पोटाचे आरोग्य अवलंबून नसून ते व्यायामावरही अवलंबून आहे.  यांकरितां नियमितपणे कांही व्यायाम घेणेही आवश्यक आहे.  पुढील व्यायामप्रकार हे पोट नितळ ठेवावयास खूपच मदतरुप ठरतात.

व्यायाम 1 ला - 

पाठीवर सपाट निजावे.  दोन्ही हातांची बोटे एकत्र जुळवून ओटीपोटावर ठेवावी.  मग तळहातांनी पोट हलकेच आंत दाबावे.  हात सैल सोडून दाब काढावा व पोट उचलावे.  असे पांच सहा वेळा करावे.  सुरवातीला अशी हातांची मदत घ्यावी.  नंतर हातांची मदत घेतल्याशिवाय केवळ श्वासो श्वासोच्छ्वासाच्या क्रियेने पोटाचा तोच भाग स्नायूंच्या हालचालीने वर ओढावा,  आंत सोडावा.  या व्यायामाचा मुख्य भर ओटीपोट आंत घेणे आणि बाहेर सोडणे यावरच असतो.

व्यायाम 2  रा - 

पाठीवर सपाट ताठ निजावे.  मग दोन्ही गुडघे वर उचलून शक्य तितके पोट आणावे.  पुन्हा खाली सोडावे असे दहा वेळां करावे.

व्यायाम 3 रा -  

सरळ, पाठ असलेल्या खुर्चीवर ताठ बसावे.  खुर्चीवर पाठीला पाठ लावून बसावे.  दोन्ही हातांचे तळवे ओटीपोटावर ठेवून ओटीपोट आंत ओढावे.  मग बाहेर सोडावे.  ही हालचाल शक्य तेवढया जलद गतीने करावी.  कांही दिवसांनी सवय झाली की हात न ठेवता हा व्यायाम करता येतो.  पाठ दुखण्याची किंवा पाठ भरून येण्याची ज्यांना सवय आहे त्यांना या व्यायामाने दुहेरी फायदा होईल.  एक तर पोटाचा घेर कमी होईल आणि पाठीचे दुखणे जाईल.  खुर्चीवर ताठ बसतांना पाठीचे सगळे मणके खुर्चीच्या पाठीला दाबून ठेऊन ताठ बसावे.

व्यायाम 4 था - 

ताठ पाठीच्या खुर्चीवर बसावे.  दोन्ही पाय जमिनीवर नेटाने ठेवावेत.  पायांच्या दोन्ही टांचा खुर्चीच्या पुढच्या दोन्ही पायांना चिकटून ठेवाव्यात.  नंतर दोन्ही हात कमरेवर ठेवावेत.  आणि मग पाठ जेवढी ताठ ठेवता येईल तेवढी  ठेवून पुढे वांकावे.  जितके वांकता येईल तितके वांकावे.  काही दिवसांनी छाती आपोआप गुडघ्याला लागते.  वाकतेवेळी पोटाचे स्नायु आकुंचन करून आंत ओढून घ्यावेत.

व्यायाम 5 वा - 

खुर्चीवर ताठ बसावे.  दोन्ही हात मागे ठेवावेत.  मग शरीर डाव्या बाजूला जितके वाकवतां येईल तितके वांकवावे.  पुन्हा सरळ व्हावे.  त्यानंतर तसेच उजव्या बाजूला वांकवावे.

या व्यायामापैकी जो सोयीचा वाटेल तो नियमितपणे करावा.

संबंधित त्रासावर अधिक प्रभावकारक उपाय मिळवण्यासाठी Subscribe करा. 
Subscription Fees : 1001/- Rupees only

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

Translater

Post Top Ad

Post Bottom Ad

Powered by Blogger.